जपानी व्यवस्थापन तंत्र हे भारतीय संस्कृती व बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे .डॉक्टर भानोसे.
जपानी व्यवस्थापन तंत्र हे भारतीय संस्कृती व बुद्ध तत्वज्ञानावर आधारलेले आहे – डॉ भानोसे
जपान मध्ये गणेश उत्सव नसताना हि त्या लोकांनी आपल्यातील गणेशाची पूजा करून आपली बुद्धी वापरून नवनिर्मित्ती केली आहे . उत्तम दर्जा , ग्राहक समाधान , सुरक्षितता , परवडणारी किंमत आणि उत्पादकतेच्या जोरावर त्यांची उत्पादने जगात लोकप्रिय होत आहे व जपान हे राष्ट्र आर्थिक सबळ होत आहे . आपण भारतीय फक्त ढोल ताशे वाजवत गणेश उत्सव साजरा करत आहोत परंतु बुद्धी वापरून नवनिर्मित्ती मध्ये फार मागे आहोत तेव्हा आपण हि जपानी लोकांन्प्रमाणे बुद्धी वापरून नवीन शोध लावले पाहिजे व आपले उत्पादने जगात विकले पाहिजे तरच भारत समर्थ होईल व सर्वांगीण विकास होईल .जपानी व्यवस्थापन तंत्र हे भारतीय संस्कृती व बुद्ध तत्वज्ञानावर आधारलेले आहे .त्याचे आचरण केले तर सर्वांचा विकास निश्चित आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध औद्योगिक कीर्तनकार आणि जपानी व्यवस्थापन तज्ञ डॉ संदीप भानोसे ह्यांनी केले .
६ सेप्टेम्बर रोजी सुचेता भानोसे – कुलकर्णी ह्यांच्या स्मृतीदिना निमित्त नासिकच्या प्रसिद्ध समाज कार्य महाविद्यालयात ,” जपानी व्यवस्थापन तंत्र “ ह्यावर गरुडझेप प्रतिष्ठान ने निशुल्क कार्यशाळा आयोजित केली होती . प्राचार्य विलास देशमुख ह्यांनी ओळख व प्रास्ताविक केले .डॉ भानोसे ह्यांनी अनेक उदहरण देत सांगितले कि ,” भारतीय उद्योगाने आपली मानसिकता सकारात्मक केली पाहिजे व विचारात लवचिकता आणली पाहिजे . नवीन तंत्र व तत्व आचरणात आणले तर यश प्राप्ती होऊ शकेल “.सूत्र संचालन डॉ सोनल बैरागी यांनी केले . डॉ जगताप , प्रतिभा पगार ,सुनिता जगताप, चंद्रप्रभा निकम , मनीषा शुक्ला ,सोनाल बैरागी , प्रतिमा पवार व अनेक विद्यार्थी उपस्थित होते . अजय जाधव व प्रशिक सोनवणे ह्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रणिता जाधव व दिपाली वडनरे ह्यांनी केले.
सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मंडळींनी 1626 सातत्यपूर्ण दिवसाचे वाहतूक सुरक्षा अभियान राबविले.