ब्रेकिंग

वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कर्मचाऱ्यांसाठी मनसेच्या लढ्यास अखेर यश–दिलीप दातीर.

वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कर्मचाऱ्यांसाठी मनसेच्या लढ्यास अखेर यश–दिलीप दातीर.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीररीत्या काढलेल्या ४५० ते ५०० सफाई कामगारांना न्याय मिळण्यासाठी सोमवार दिनांक २०.०२.२०२३ रोजी स. ०९.०० वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे नाशिक महानगरपालिकेच्या दारावर सुरु असलेल्या ‘आमरण उपोषणास’ अखेर यश आले असून मा. मनपा आयुक्तांनी दोन दिवसांत ह्या कामगारांना परत कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार विविध मार्गांनी ह्या गोरगरीब कामगारांच्या समस्या मा.मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींसह मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, मा.न्यायालय आदि विविध स्तरांवर मांडले.मात्र ह्या गोरगरीब कामगारांना न्याय न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या / आमरण उपोषणाच्या हत्याराचा उपयोग केला.
सोमवार सकाळी ०९.०० वाजेपासून सुरु असलेल्या मनसेच्या इतिहासातील ह्या पहिल्याच उपोषण आंदोलनास यश येऊन मा. मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक,कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाताताई डेरे,कामगार सेना चिटणीस तुषार(बंटी)जगताप,शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे यांच्या शिष्टमंडळास ह्या कामगारांना दोनच दिवसांत परत कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनपा उपायुक्त नेर साहेबांनी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना लिंबू शरबत देऊन उपोषणाचा यशस्वी समारोप केला. यासह ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कामगारांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले दोन दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे.
दोन दिवस चाललेल्या ह्या आमरण उपोषणास ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीच्या कामगारांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक,प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम,कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे,शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम (मामा) शेख,महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाताताई डेरे,जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडेके,कामगार सेना चिटणीस तुषार(बंटी)जगताप,शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे,सचिन सिन्हा, विजय आहिरे,विभाग अध्यक्ष योगेश लभडे,नितीन माळी,साहेबराव खर्जुल व धिरज भोसले,शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे,शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, निखील सरपोतदार,शहर संघटक हरीश गुप्ता,संजय देवरे,अमित गांगुर्डे,अर्जुन वेताळ,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर,अतुल पाटील,जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रफुल बनभेरू,शहर चिटणीस संदिप दोंदे,किशोर वडजे, महिला सेना जिल्हाध्यक्षा वैशालीताई पोतदार,ज्योतीताई शिंदे,शहराध्यक्षा अक्षरा घोडके, शैलाताई शिरसाठ, मुक्ताताई इंगळे,अॅड.महेंद्र डहाळे, देवचंद केदारे,कैलास मोरे,विशाल भावले,पंकज दातीर,शशिकांत चौधरी,नितीन धानापुने,गणेश मंडलिक, ललित वाघ, शुभम थोरात यांच्यासह ‘वॉटरग्रेसचे समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव यांच्यासह २५० कामगार त्यांच्या कुटुंबियांसह ‘वॉटरग्रेस’ च्या ठेकेदारांच्या अन्यायीकृती विरोधात आमरण उपोषणास बसले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे