महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायकल अभिवादन रॅली.

नाशिक जनमत प्रतिनिधी -महामानव बोधीसत्व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त नाशिक मध्ये प्रथमच आयोजित केलेल्या सायकल आभिवादन रैलीची सुरूवात नाशिकरोड येथील भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन पहाटे ६.३० वाजता अभिवादन करून सुरू झाली. या रैलीचे आयोजन रायल रायडर प्रमुख डाॕ.आबा पाटील यांनी केले सायकल अभिवादन रैलीत डाॕ.भाऊसाहेब कसाव ,राजाभाऊ शहाने,विजय भावसार,मुकुंद गायकवाड आदी सायलीस्ट सहभागी झाले होते या रैलीचा समारोप टाकळी येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला.हि रैली यशस्वी व्हावी म्हणून रेल्वे डाक सेवेचे सायकलीस्ट रत्नाकर शेजवळ यांनी प्रयत्न केले.शहरात पहील्यांदाच सायकल चालवून महामानवाला अभिवादन करण्यात आले पुढील वर्षी १३३km सायकल चालवून अभिवादन रैली केली जाणार अशा संकल्प यावेळी केला.