नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायन.
दि. 17 ऑगस्ट, 2022
*नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात समुह राष्ट्रगीत गायन*
*नाशिक दि.17 ऑगस्ट,2022*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत समुह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन नाशिक विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी अपर आयुक्त भानुदास पालवे, सामान्य प्रशासन उपायुक्त रमेश काळे, पुनर्वसन उपायुक्त उन्मेष महाजन, नियोजन उपायुक्त प्रदीप पोतदार, रोहयो उपायुक्त अरुण आनंदकर, नगरपालिका प्रशासन उपसंचालक संजय दुसाणे, भू-सुधार उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, तहसिलदार योगेश शिंदे, अनिल पुरे, साहेबराव सोनवणे, महेश चौधरी, नरेश बहीराम तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक विभागीय महसुल आयुक्त कार्यालयास जाहीर झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता पुरस्काराच्या रकमेतून उभारलेल्या पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण यंत्रणा व वाटरकुलरसंचाचे उद्धघाटने श्री.गमे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.