महाराष्ट्र

दुसऱ्या श्रावणी सोमवारी पिनाकेश्वर महादेवाचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन.

पिनाकेश्वर महादेवाचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन

 

अरुण हिंगमीरे

जातेगांव, नांदगाव

 

नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उतःतरेस सात किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेतील हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या शिकरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेवाचे दि. ८ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसर्या सोमवारी पहाटे चार वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ हजर पेक्षा अधिक अबालवृध्दासह महिला व पुरुष भाविकांनी दर्शणाचा लाभ घेतला. या वर्षी प्रथमच ओडिशा राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या विस तरश्री क्षेत्र वेरूळ येथून अनवाणी पायाने ७० किलोमीटर अंतर चालत कावडीने पवित्र जल आणून जलाभिषेक केला. असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष अंकुश वर्पे यांनी दिली.

 

याप्रसंगी आलेल्या भाविकांनी येथे येण्यासाठी चांगला रस्ता नाही, पुरेशी नागरी सुविधा नाही तसेच वाहनांसाठी वाहनतळ नाही, आरोग्य सुविधांंचा अभाव असल्याबाबत खंत व्यक्त केली.

तसेच श्रावण महिन्याच्या निमित्ताने सुमारे दोनशे पेक्षा अधिक व्यवसायिकांनी प्रसाद बेल फुलांचे आणि इतर दुकाने थाटली होते परंतू मंदिरापासून सुमारे येथे सातशे फुटापेक्षा जास्त अंतर असल्याने दर्शनासाठी आलेले भाविक देवाचे दर्शन झाल्यानंतर सरळ परतीच्या वाटेला लागत असल्याने व्यवसाय होत नसल्याचे सांगितले.

याबाबत ट्रष्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणे आवश्यक असून त्यासाठी ट्रष्टच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यास श्री पिनाकेश्वर महादेवाच्या कृपाशीर्वादाने यश मिळाले असून सुमारे पाच कोटी रुपये वनपर्यटन विभागाने मंजूर केले आहे. परंतू वन विभागाच्या काही जाचक अटी मुळे येथील विकास कामांना सुरुवात झाली नाही, तरी पुढच्या वर्षापर्यंत बर्यापैकी कामे मार्गी लागतील.

तसेच व्यवसायीकांच्या प्रश्नावर बोलतांना चव्हाण यांनी सांगितले की, शासनाच्या निधीतून वरील कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काही दिवसातच व्यापारी संकुल आणि इतर नागरी सुविधा तसेच इतर जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणारा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक इश्वर पाटील पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे, पोलीस नाईक सागर कुमावत, पोलीस शिपाई प्रदिप बागुल, दत्तात्रय सोनवणे, महिला पोलीस शिपाई इंगळे यांच्यासह विस पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

 

फोटो

महादेवाची पिंड, मंदिर दर्शनबारितील भाविक, बाहेर स्वतः दर्शन बारी करून उभे असलेले महिला भाविक, आणि ओडिशा राज्यातील कावडीने जल आणलेले भाविक

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे