सिडकोतील वनश्री कॉलनी मध्ये एकाच वेळेस पाणी. सकाळ संध्याकाळ पाणी येण्याची महिला वर्गाची मागणी.
नाशिक जनमत नाशिक शहरात दररोज सकाळ संध्याकाळ पाणीपुरवठा केला जात असतो त्यामुळे काही नागरिकांना मुबलक पाणी मिळते. सध्या विविध पाईपलाईनचे काम चालू असल्याने नाशिक शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरात सर्वत्र दोनदा पाणी येत असून सिडकोतील डीजीपी नगर 2 वन श्री कॉलनी या भागात मात्र गेल्या अनेक वर्षापासून एकच वेळेस पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. इतर सोसायटी रो हाऊस नागरिकांप्रमाणे महानगरपालिकेची पानपट्टी वनश्री कॉलनीतील नागरिकांना देखील भरावी लागत आहे पानपट्टीत कोणताही फरक नाही. परंतु वन श्री कॉलनीतील अनेक सोसायटीमध्ये एक सकाळचा पाणीपुरवठा केला जातो परंतु संध्याकाळी व रात्री या भागात पाणीपुरवठा केला जात नसल्याने महिलावर्ग संतप्त झालेला आहे नाशिक शहरात ज्याप्रमाणे दोनदा पाणीपुरवठा केला जातो त्याचप्रमाणे वन श्री कॉलनी अंबड परिसरात देखील दोनदा पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी महिलावर्गांनी केलेली आहे. महालक्ष्मी नगर स्वामी नगर या भागात देखील एकच वेळेस पाणीपुरवठा केला जातो. या बातमीची दखल या भागातील लोकप्रतिनिधी यांनी घेऊन ताबडतोब नाशिक महानगरपालिकेने वन श्री कॉलनी स्वामी नगर महालक्ष्मी नगर या भागात सकाळी व रात्री पाणीपुरवठा कराव. व पाणी टंचाई पासून नागरिकांना दूर करावे अशी मागणी महिला वर्गांनी संतप्त होत नाशिक जन्मत कडे गेलेली आहे.. महानगरपालिकेने लवकरात लवकर दखल घेऊन या भागात दोनदा पाणीपुरवठा करावा. अन्यथा या भागातील महिलावर्ग महानगरपालिकेवर हंडा व पाण्याची भांडी घेऊन मोर्चा मोर्चा काढणार असल्याचे कळते.