पर्यटन स्पेशल सिटीलीक बसेस सोडण्याची नागरिकांची मागणी.
नाशिक जनमत सध्या पावसाळा चालू असून नाशिक परिसरातील निसर्ग हिरवा गार झालेला आहे निसर्गाने हिरवा शालू परिधान केलेला आहे नाशिक मधील थंड हवामान यामुळे हा परिसर खूपच छान वाटतो तसेच आजूबाजूला असलेल्या डोंगर दर्या तसेच त्र्यंबकेश्वर महादेव ज्योतिर्लिंग मंदिर तसेच चांदवड येथील रेणुका माता मंदिर राहुल घाटातील चंद्रेश्वर महादेव मंदिर गणपती मंदिर व पहिने येथील धबधबा पाण्यासाठी पर्यटन दर्शनासह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नाशिक तसेच विविध राज्यातून पर्यटक येत असतात सध्या सिटी लिंक बस प्रवासी कमी असल्याने तोट्यात चालू आहे दरम्यान सध्या पावसाळा व पर्यटनाचा मोसम असल्याने शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहे तसेच नाशिक परिसरामध्ये विविध डोंगर पहाड गड किल्ले धरणे इत्यादी निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणी पर्यटन स्पेशल किंवा नाशिक दर्शन अशा प्रकारे बसेस सोडल्या तर मोठ्या प्रमाणात प्रवासी सिटीलिंग बसला मिळू शकतील व तोट्यात चालणारी बस नफ्यात येऊ शकेल असे अनेक प्रवाशांनीनाशिक जनमत बोलून दाखवले. नासिक महानगरपालिकेने अधिकारी तसेच आयुक्त यांनी नाशिक जन्मतच्या वृत्ताची दखल घेऊन पर्यटनासाठी स्पेशल बसेस सोडाव्या अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.