ब्रेकिंग

नाशिक महानगरपालिका महापौर दालनात बांधकाम अधिकारी व ठेकेदारांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न; नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य, रस्ते दुरुस्ती कामांना गती देण्याचे महापौरांचे निर्देश*

लवकरात लवकर खड्डे बनवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

*नाशिक महानगरपालिका महापौर दालनात बांधकाम अधिकारी व ठेकेदारांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न; नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य, रस्ते दुरुस्ती कामांना गती देण्याचे महापौरांचे निर्देश*

📍नाशिक  जनमत  , दि. ४ ऑगस्ट २०२६ –
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती लक्षात घेऊन काल नाशिक महानगरपालिका महापौर दालन येथे बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत शहरातील विविध विभागांतील रस्त्यांची स्थिती, प्रलंबित दुरुस्ती कामे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. कामाचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा, मनुष्यबळ आणि संसाधने तातडीने वाढविण्याचे निर्देश मा. महापौर सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके यांनी दिले.

बैठकीत महापौरांनी स्पष्ट केले की, नागरिकांना दिलासा देणे हे महानगरपालिका प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन वापराशी थेट संबंधित मूलभूत सुविधा आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते त्वरित वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्यासाठी दररोज दिवस-रात्र अविरतपणे काम सुरू ठेवावे, असे सक्त निर्देश देण्यात आले. तसेच शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामात कोणताही खंड पडू न देता दुरुस्तीची कामे सातत्याने सुरू ठेवावीत, असेही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करताना महापौरांनी आवश्यक बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याबाबत चिंता न करता जास्तीत जास्त क्षमता वापरून आणि उच्च दर्जाची गुणवत्ता राखून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासाठी साहित्य उपलब्धता, यंत्रसामग्री, वाहतूक आणि मनुष्यबळ वाढवून यांचे समन्वयित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

रस्त्यांची प्रभावी दुरुस्ती करून ते त्वरित वाहतुकीस योग्य (मोटरेबल) करण्यासाठी GSB, Cold Mix, Interlocking Paver Block Patches, कडक मुरूम आणि खडी यांचा वापर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामांची गुणवत्ता राखावी, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

मा. कुंभमेळा मंत्री श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष Development Plan तयार करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या विशेष योजनेद्वारे कॉलनी रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे.

महापौरांनी बांधकाम विभागाला दररोज कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे