ब्रेकिंग

पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना लुटणाऱ्या आरोपींना केले पोलिसांनी गजाआड.

पंचवटीतील एकाला लुटले होते 70 लाखाला.

 

 

नाशिक  जनमत

आम्ही पोलीस आहोत असा बनाव करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. या टोळीकडून बनावट ओळखपत्र तसेच अनेक सबमशीन गण इत्यादी हत्यारे मिळून आले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की

वाहनावर पोलिसांचा दिवा, सोबत घातक सबमशिन गन, तपास यंत्रणांचे बनावट ओळखपत्र, देहबोलीत पोलिसांचा तोरा अशी एखाद्या सिनेमाप्रमाणे ‘हायप्रोफाइल’ लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नाशिक शहर पोलिसांनी अटक केली. पंचवटीतील एका तरुणाला ७० लाखांना लुटणाऱ्या टोळीकडून मशिनगन, रिव्हॉल्व्हर, बनावट ओळखपत्रांसह शिक्के असा ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या माहितीनुसार, उमाशंकर वर्मा (४०, रा. उत्तर प्रदेश), सुजीतकुमार दुबे (३२, रा. झारखंड), नीलेश पका (२७, रा. वसई) व संगीता अहिरे (रा. कोणार्कनगर, मूळ रा. जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. पंचवटीतील दक्षेशकुमार प्रजापती (२९) हे दिंडोरी नाका येथील कंपनीत कार्यरत आहे. ते ८ जुलैला कंपनीच्या व्यवहारासाठी ७० लाखांची रक्कम घरी नेत होते. त्यावेळी लाल दिव्याच्या कारमधून आलेल्या संशयितांनी त्यांना वाहनात बसवले. कारमध्ये एक महिला व चालक होते. ७० लाख रुपये, मोबाइल हिसकावून संशयितांनी मुंबईच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, ही कारवाई बनावट असल्यचा

 

 

 

(प्रजापतीकडे पैसे असल्याची माहिती कोणी दिली, याचीही चौकशी सुरू)

 

 

 

 

 

संशय आल्याने प्रजापतींनी पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांच्या सायबर, रेकी पथक, क्यूआरटी अशा ३४ अंमलदारांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावला.

 

… असा लागला शोध

 

संशयितांकडे ‘एमपी ५’ यासारखी एक बंदूक होती. त्यानुसार सीसीटीव्ही आले. कारच्या तपासण्यात क्रमांकावरून माहिती मिळवून पोलिसांनी वेशांतर करून

 

संशयितांचा माग काढला. संशयित महिला नाशिकमधील असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. बिटको चौक ते जेलरोड परिसरात सोमवारी सायंकाळी कार पोलिसांचा दिवा लावून फिरताना दिसली, पोलिसांनी ती ताब्यात घेतल्यावर एकाकडे रिव्हॉल्वर सापडले. कारच्या पुढील आसनाखाली सब मशिनगन, तर इतर भागात उर्वरित मुद्देमाल आढळला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे