ब्रेकिंग

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 मे पर्यंत. शस्त्र व जमावबंदी आदेश जारी.

 

*नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 मे पर्यंत*

*शस्त्र व जमावबंदी आदेश जारी*

 

*नाशिक,जनमत  दि. 29 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा):* कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 14 मे 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 28 मे 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण यांनी आदेशात नमूद केले आह

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे