ब्रेकिंग

अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ५० अतिक्रमणे हटविली*

 

  •  नाशिक जनमत    अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ५० अतिक्रमणे हटविली*

नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात शनिवारी पहाटे धडक अतिक्रमण मोहीम राबवून या अतिक्रमण मोहिमेत सुमारे ५० दुकाने हटविली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचे मार्गदर्शनाखाली,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे निर्देशानुसार व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या सह पोलीस विभागाचे अधिकारी, मनपाचे विभागीय अधिकारी व मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.

*मोहिमेत ५० अतिक्रमणे हटविली*

सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम व पत्र्याचे शेड असे एकूण ५० अतिक्रमणे या मोहिमेत हटविण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या

वतीने देण्यात आली.

*मनुष्यबळ व सामग्री*

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मनपाच्या सहाही विभागातील अतिक्रमण विभागाचे पथके यांचे सह ५ जे.सी.बी ६ ट्रॅक्टर आदी सामग्रीच्या सहाय्याने ही मोहीम पार पडली.

मोहीम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी हेमंत झुटे,चंदन घुगे,गुणवंत वाघ, स्वप्निल भांगरे, विनायक जाधव,सहाय्यक अधीक्षक संजय चौधरी,वाघ

गाडी प्रमुख प्रवीण बागुल,जीवन ठाकरे भगवान सूर्यवंशी निखिल तेजाळे,अमित पवार आदींसह सहाही विभागीय कार्यालयातील अतिक्रमण पथकातील कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे