बलात्कारी भोंदू खरातच्या विकृत कृत्यामुळे बदनाम झालेली जागा गोमूत्र व पाणी शिंपडून केली पवित्र…….

बलात्कारी भोंदू खरातच्या विकृत कृत्यामुळे बदनाम झालेली जागा गोमूत्र व पाणी शिंपडून केली पवित्र…….
सामाजिक कार्यकर्ते शरद शिदे पाटील व गावकऱ्यांनी गोमूत्र शिंपडून बदनाम झालेली ईशान्यश्वर मंदिर परिसर जागा पवित्र केली.
नाशिक जन् मत भोंदू बाबा सिन्नर तालुक्यात जन्माला आला. त्याने हजारो महिलांवर बलात्कार करून सिन्नर तालुक्यातील भूमी बदनाम केली. राक्षसाला लाजवेल असे भयानक विकृत वागण्यामुळे अशोक खरात व काही पुढारी यांनी अपवित्र केली आहेत.सिन्नर तालुक्यातील जनतेला शरमेने खाली मान घालायला लावली.ती बदनामी कधीही भरून निघणार नाही.
हिंदु धर्मात अशी अपवित्र व बदनाम जागा गाईच गोमूत्र व कडू लिंबाचा रस किंवा पाणी शिंपडून पवित्र केली जाते.ही अंध श्रद्धा नाही तर श्रद्धा आहेत व शास्त्रीय आधार आहेत.जनभावना आहेत. सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे पाटिल व मिरगावच्या लोकांनी प्रतिकात्मक फाशी आंदोलना नंतर मिरगाव येथील ईशान्यश्वार मंदीर परिसरात गाईच गोमूत्र व पाणी शिंपडून जागा पवित्र केली. पुन्हा असे राक्षस सिन्नर तालुक्यात जन्माला येऊ नयेत अशी महादेवा कडे प्रार्थना केली. 
यावेळी शरद शिदे पाटील सह मच्छिंद्र नाजगड :दशरथ हंडोरे: शिवाजी गुंजाळ :बाबासाहेब शेळके: चिंध्या भाऊ गुंजाळ: भागवत शेळके: अशोक शेळके: जोर्वेकर दादा: सर्जेराव शेळके साहेबराव शेळके व मिरगाव :शहा पाथरे गावाती ग्रामस्थ सहभागी झाले होते.


