राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे वतीने ओ बी सी बचाव आंदोलनास जाहीर पाठिंबा
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे वतीने
ओ बी सी बचाव आंदोलनास जाहीर पाठिंबा
Naashik. janmat. वाडी गोद्री ता. जालना येथे प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे चालू असलेले ओ. बी. सी. बचाव आंदोलनास दि.१९ जुन २०२४ रोजी समितीचे राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष माया बुरकुल ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सोपान बांगर व इतर पदाधिकारी यांनी भेट देवून राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे वतीने जाहीर पाठिंबा दिला. सदर प्रसंगी समितीचे राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. तसेच समितीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी यांना ओ. बी. सी. आरक्षण बचाव आंदोलनास जाहीर पाठिंबा असलेबाबद समिती जिल्हा अध्यक्ष यांचे वतीने निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती ओ. बी. सी.बचाव आंदोलनास पाठिंबा म्हणून नाशिक येथे पाच दिवसांचे साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शशीकांत घुगे यांनी सांगितले. समाजातील सर्व ओ.बी. सी.समाजाने हया आंदोलनात सक्रिय सहभाग घेवून प्रत्यक्ष भेट देण्याचा प्रयत्न करावा असे राष्ट्रीय उपाध्यक्ष मायाताई बुरकुल यांनी आवाहन केले.