अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये महाशिवरात्री उत्सवात साजरी
महाशिवरात्र उत्साहात साजरी बम बम भोले चा गजर करत भाविकांचे शिव मंदिरात दर्शन.
नाशिक प्रतिनिधी कोरोना महामारी नंतर प्रथमच महाशिवरात्रीचा उत्सव शिवभक्तांनी भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. अंबड औद्योगिक वसाहतीतील रुद्रेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ब्रह्म मुहूर्तावर महादेवाच्या पिंडीला महा अभिषेक करण्यात आला संत जनार्दन स्वामी महाराज, विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध देवदेवतांचे अभिषेक व पूजन करण्यात आले संध्याकाळी 6ते रात्री 12 वाजेपर्यंत शिवरात्री निमित्त शिवजागर करण्यात आला भजन सोहळ्याची सुरुवात अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र या वारकरी भजनाने करण्यात आली यावेळी श्रीक्षेत्रकावनई येथील भजनी मंडळाने शिव भोळा चक्रवर्ती, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, यासह शिव भोला भंडारी, भाग्यवंता घरी भजन पुजन यासह विविध भजने गात समारोपाच्या वेळी गवळणी चे सादरीकरण झाले राधेचा कान्हा, डोईवर दह्याचा माठ यासह भाविकांनी भजनात नाचत आनंद व्यक्त केला रात्री बारा तीस वाजता आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित भाविकांसाठी शिवरात्री निमित्त साबुदाणा फराळ व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वजीत उद्योग समूहाचे संचालक शिवाजी अभंग यांनी केले होते. यावेळी श्री गजानन भक्त मंडळाचे अध्यक्ष कथा जेष्ठ नर्मदा परिक्रमाकर्ते प्रल्हाद महाराज भांड यांच्यासह रमाकांत दातीर, सिताराम भांड, राजेंद्र खानकरी, मिलिंद आहेर, निवृत्ती आहेर, गोकुळ शिंदे, अरुण भांड, प्रमोद बोरसे, महेश थेटे,अमोल शुक्ला आदींसह भाविक उपस्थित होते.