ऊस तोडी मुळे सुरक्षेची चिंता. बिबट मातेकडून बछड्यांची फंडातून सुटका
नासिक जनमत त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळवाडे येथे ऊस तोडी सुरू असताना कामगारांना सायंकाळी तीन ते चार दिवसाचे बिबट्याचे तीन पील्ले दिसून आली. वन विभाग व इको संस्थे कडून दिसून येतील असे कॅमेरे तेथे लावले अंधार होताच मादी आपल्या पिल्लंन जवळ आली परंतु ऊसतोड सुरू असल्याने सुरक्षा धोक्यात आल्याचे पाहून तिने आपल्या तिन्ही बछड्यांना सुरक्षित स्थळी हलवले शेवटी आई ती आई असते हे दिसून आलेले आहे आणि हे क्षण ट्रॅप कॅमेरा मध्ये केद झाले असून नाशिक शहर परिसरातील गावांमध्ये हे नेहमीच दिसून येत आहे. सध्या ऊस तोडणी चा सिझन असून उसाच्या शेतामध्ये बिबटे व मादी अनेक ठिकाणी लपलेले असतात. वन विभागाने नागरी वस्तीमध्ये पिंजरा लावून अनेक बिबट्यांना जेरबंद केलेला आहे आईची माया ही मुक्या प्राण्यांमध्ये देखील असते. आता तर जंगलातील जंगले नष्ट होत असल्याने व अनेक ठिकाणी जंगलात उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने शहरी भागाकडे बिबट्या व निसर्ग प्राणी शहरात येत असल्याचे अनेक वर्षापासून दिसून येत आहे वन विभागाने जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी उभारून पिण्याच्या पाण्याची प्राण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहे.