बीडमध्ये जरांगे पाटील व मित्रमंडळी लिफ्ट अपघातात. बाल बाल बचावले.
–
मनोज जरांगेंची लिफ्ट अचानक कोसळली, पण सगळे सुखरूप
प्रतिनिधी | मनोज जरांगे व सहकारी काल बीड येथे
लिफ्टच्या अपघातामध्ये बाल बाल बचावले. एका रुग्णालयामध्ये एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जरांगे पाटील गेले होते यावेळेस लिफट ने वर जाताना
क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसल्याने रुग्णालयाची दुसऱ्या मजल्यावर जाणारी लिफ्ट पहिल्या मजल्याजवळ गेल्यानंतर पुन्हा तळमजल्यावर २५ सेकंदांत आदळली. या लिफ्टमध्ये मनोज जरांगे होते. बीड शहरातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. मनोज जरांगे वडगाव येथील सप्ताहाचा सांगता समारंभ व काल्याच्या कीर्तनास उपस्थित राहिल्यानंतर रविवारी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील एका रुग्णालयात परिचिताला भेटण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत अनेक सहकारी होते. दुसऱ्या मजल्यावर हा रुग्ण असल्याने लिफ्टने जरांगे हे वर जात होते. कार्यकर्तेही लिफ्टमध्ये शिरले. क्षमतेपेक्षा अधिक वजनाने दुसऱ्या मजल्यावर जाणारी लिफ्ट पहिल्या मजल्यावर पोहोचण्याआधीच तुटून तळमजल्यावर आदळली.. लिफ्टचा दरवाजा आपत्कालीन चावीने उघडून जरांगे यांना बाहेर काढले गेले. यात जरांगे अथवा कुणालाही इजा झाली नाही.