नाशिक शहरात इतर देशातील अनधिकृत पणे राहणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले. चार बांगलादेशी महिला ताब्यात.
नाशिक शहरात बांगलादेशी नागरिकांप्रमाणेच नेपाळी नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्य वाढले आहे. अनेक नेपाळी स्थायिक झालेले आपल्या नातेवाईकांना आनाधिकूत कृतपणे आणून नाशिक शहरामध्ये काम करण्यास लावतात. यानंतर सहा महिने राहिल्या नंतर नगरसेवक यांच्याकडून रहिवासी दाखला काढतात. त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड काढून स्थायिक होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे सरासपणे पोलिसांचं महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे त्याचप्रमाणे बांगलादेशी नागरिक देखील मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये आलेले आहेत. कालच अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांसह या महिलांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या सुरत येथील संशयित एजंटला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या एजंटला ताब्यात घेतल्यांनतर त्याच्याकडून बांगलादेशी महिलांची भारतात वेगवेगळ्या शहरात कशाप्रकारे अनैतिक व्यवसायासाठी आणले जात असल्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
युनिट १ च्या पथकाने अमृतधाम परिसरातील खैरे मळा, लक्ष्मीनगर येथे सापळा रचत छापा टाकून ही कारवाई केली. नवजीत भवन दास (रा. सुरत) हा एजंट तसेच माईशा हबिब शेख (२२), निशान मिहिर शेख (२१), झुमरू हसन शेख (३०), रिहाना जलील गाझी (३०, रा. बांगलादेश) असे या घुसखोरी करणाऱ्या महिलांची नावे आहेत. अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे.