ब्रेकिंग

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे विहित कालावधीत खर्चाचे नियोजन करावे* *जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

*जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे विहित कालावधीत खर्चाचे नियोजन करावे*

*जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

 

*जिल्हा नियोजन समितीच्या विविध कामांचा आढावा*

 

*नाशिकजन्मत, वृत्तसेवा)* : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. 2026 – 2027 च्या प्रारूप आराखड्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, जिल्ह्याला 900 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून 451 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. आतापर्यंत 169 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी निधी वेळेत खर्च होऊन कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. प्रगतीपथावरील कामांना गती द्यावी. तसेच दायित्वाच्या निधीबाबत तत्काळ जिल्हा नियोजन समितीकडे माहिती सादर करावी. आरोग्य विभागाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी औषधांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. निविदा प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पूर्ण करावी. विभागांनी प्रस्ताव सादर करताना आयपास या संगणकीय प्रणालीचा वापर करावा. तसेच एमपीएसआयएमएस या प्रणालीवर नोंदणी करून ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा. खर्च केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावे.

 

आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन सन 2026-27 चा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल याप्रमाणे कामांचे प्रस्ताव

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी मागील वर्षातील अपूर्ण कामे, यावर्षीच्या कामांची सद्यस्थिती व पुढील वर्षांत करण्यात येणीरी कामे यांचा विविध

विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे