ब्रेकिंग
जत्रा चौफुली ते नांदूर चौफुली दरम्यान पती सोबत जात असताना महिलेची सोन्याची पोत लांबवली.
नाशिक जन्मत महिलांची। सोनसाखळी तोडणाऱ्यांचे प्रमाण नाशिक शहरात वाढू लागली आहे. पोलिसांची गस्त तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे जरुरीचे झाले आहे जत्रा-नांदुर रोडवर हॉलबाहेर पतीसोबत पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. आडगाव, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रावस्ती गायकवाड (रा.
सिन्नर फाटा) यांनी तक्रार दिली. रात्री ९,३० वाजता साखरपुड्यासाठी आल्या होत्या. रस्ता ओलांडून पतीसोबत गाडीकडे जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील एक मंगळसूत्र
खेचून फरार झाला. आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव शिवारात दोन दिवसांत २ लुटीच्या घटना घडल्या. गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.