ब्रेकिंगमहाराष्ट्र
सटाणा येथे आईल मिल् ला भीषण आग आग वीजवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू .
सटाणा येथील बांगडिया शेंगदाणा ऑइल मिल ला आग लागली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळावर दाखल झालेले आहे मोठ्या प्रमाणात भू मुगाच्या शेंगा चे पोते या आईल मिल मध्ये आहेत त्यामुळे आगीने रुद्र रूप घेतले होते घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती आगीचे लोळ लांबून अंतरावरून दिसत होते. जेसीबीच्या साह्याने अनेक शेंगदाण्याचे पोते ऑइल मिलमधून बाहेर काढण्यात येत होते दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान च्या दरम्यान ही घटना घडली आहे या आगी मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे