बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध अडचणी
अरुण हिंगमीरे
(जातेगांव) नांदगाव
नाशिक
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका बोरुडे ह्या त्यांच्या विवाह असल्याने दि.४ फेब्रुवारी पासून रजेवर असल्याने येथील आरोग्य केंद्राचे आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. बोरुडे ह्या त्यांच्या विवाहाच्या कारणामुळे ४ फेब्रुवारी पासून रजेवर गेल्याने येथील दुय्यम वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती गोंड ह्या आरोग्य केंद्राचा कार्यभार योग्य प्रकारे सांभाळून परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे पुरवत आहे. परंतु मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या आणि त्यांच्या सह्याचे नमुने रुग्ण कल्याण समितीच्या सचिव असल्याने बँकेत दिलेले असल्याने बोरुडे ह्या रजेवर असल्यामुळे गैरहजर असल्याने विविध औषध खरेदी असोत किंवा रुग्ण वाहिकेसाठी डिझेल खरेदी किंवा अन्य काही कामासाठी बँकेतून रक्कम काढणे कठीण झाले आहे.
गेल्या १५ डिसेंबर २०२१ पासून शासनाच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार बोलठाण सह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाचा रुग्ण वाहिकेच्या इंधन साठी, तसेच तातडीचे औषध खरेदीसाठी व इतर अत्यावश्यक सेवेसाठी स्थानिक रुग्ण कल्याण समितीच्या बँक खात्यावर शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषदे अंतर्गत थेट निधी उपलब्ध करून दिला जात असे. परंतु दि. १५ डिसेंबर २०२१
रोजी आलेल्या शासनाच्या आदेशानुसार रुग्ण कल्याण समितीचे स्थानिक बँकेत असलेले खाते तात्काळ बंद करण्यात यावे याबाबत आदेश आल्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आरोग्य केंद्राच्या बँक खात्यात रक्कम शिल्लक असतांना देखील बँक खाते शिल करून निधी गोठविल्याने स्थानिक कर्मचार्यांनी आपले वयक्तिक क्रेडिट वापरून रुग्ण वाहिकेसाठी डिझेल, आरोग्य केंद्रासाठी औषध खरेदी यासाठी उधारी केली मात्र अद्याप अनेक ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार नवीन icici या बँकेत उघडलेल्या खात्यात जुन्या खात्यातील निधी वर्ग करण्यासाठी तांत्रिक अडचण आल्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता असे समजले की शासनाच्या आयसीआयसीआय बँकेत रुग्ण कल्याण समितीचे खाते उघडणे बाबत अधिक आलेल्या आदेशानुसार खाते उघडले गेले परंतु आय सी आय सी आय बँक ही तालुकास्तरावर असल्याकारणाने भविष्यात देखील शासनाने वरील बँकेत खाते उघडणे बाबत दिलेले आदेशामुळे विविध अडचणी येऊ शकतात त्यामुळे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी किंवा परिसरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यातच व्यवहार सुरू ठेवणे योग्य असणार असल्याचे रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी सांगितले