नांदगाव येथे सेनेतर्फे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेची आढावा बैठक
अरुण हिंगमीरे
नांदगाव नाशिक
शिवसेना पक्षातर्फे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विजय शिर्के सहकारी रामचंद्र वाडेकर
यांनी मनमाड, नांदगाव व मालेगाव येथे शिवसेना कार्यालयात नगरपालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी संपर्क प्रमुख शिर्के यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना तालुक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या दमदार कार्यपद्धती मुळे गेल्या दहा वर्षात जो विकास झाला नसेल तो विकास आमदार कांदे यांच्या माध्यमातून अडीच वर्षात नांदगाव मतदारसंघात झाला आहे. ही बाब एक शिवसैनिक म्हणून आपल्यासाठी आणि तसेच नांदगाव मतदार संघातील प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय आनंददायी आहे.
आ. कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव, मनमाड शहरातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करत आहोत. 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावर चालणारा भारतातील एकमेव असा आपला शिवसेना पक्ष आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे.
मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसैनिकांपासून तर आमदारांपर्यंत आपण स्वतः त्यांच्या मदतीला धावून येतो हीच आपली शिवसैनिक म्हणून खरी ओळख आहे.
जनतेशी संपर्क वाढवणे व आपला पक्ष घराघरात पोहोचवणे, जनतेच्या अडचणी समजून घेणे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, आमदारांनी केलेल्या प्रत्येक कार्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, समाजकारण करताना प्रत्येक क्षणी समाजातील प्रत्येक घटका सोबत प्रामाणिकपणे मदतीची भावना ठेवणे अशा अनेक विषयांवर शिर्के यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उप जिल्हाधिकारी मुन्ना भाऊ दरगुडे, तालुका संघटक संजय कटारिया, तालुका प्रमुख किरण देवरे,गुलाब भाबड, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, तसेच नांदगाव बैठकीत मार्केट कमिटीचे उपसभापती राजाभाऊ देशमुख, शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, उपस्थित होते.