अर्थसंकल्पातून युवकांच्या पदरी घोर निराशा – माजी खासदार समीर भुजबळ
बेरोजगारी रोखण्यास केंद्र सरकार अपयशी.....

मुंबई,नाशिक,दि.१ फेब्रुवारी :- देशात बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना यंदाच्या केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या बजेटमध्ये रोजगाराच्या अनेक संधी युवकांना उपलब्ध होतील अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगारवाढीसाठी मोठी तरतूद नसल्याने देशातील युवकांच्या पदरी घोर निरशा पडली असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट देशावर घोंगावत असून चार कोटीहून अधिक नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहे. अशा परिस्थितीत केवळ ६० लक्ष नोकरीचे उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बेरोजगारीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे असून युवकांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा असंघटीत कामगारांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्यासाठी कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे अर्थसंकल्पात दिसत नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील कुठलीही ठोस तरतूद केली गेलेली दिसत नाही. त्याचबरोबर सरकारने हाती घेतलेले स्मार्ट सिटी अभियान, नाशिक मधील नमामि गोदा प्रकल्प, रेल्वे बाबत अर्थसंकल्पात कुठलीही विशेष तरतुत किंवा स्पष्टता दिसून येत नसल्याचे नाशिककरांच्या पदरी यंदा देखील निराशास समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.