नाशिक ते गोवा रॉयल रायडर्स बुलेट ग्रुपसोबत दिव्यांग अंजना चा सहभाग*.
*नाशिक ते गोवा रॉयल रायडर्स बुलेट ग्रुपसोबत दिव्यांग अंजना चा सहभाग*¹
दिव्यांग असूनही अंजना प्रधान हिने नाशिक ते गोवा साईड कार असलेल्या बुलेटमध्ये “रायडर मेनिया” गोवा-२०२२या इव्हेंट मध्ये सहभागी झाली.वाहतूक सुरक्षेची सर्व साहित्य वापरून, ‘वाहनाचे नियम पाळा व अपघात’ टाळा हा संदेश देत हि राईड पूर्ण केली आहे.यासाठी डॉ. संदीप भानोसे सरांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले .रॉयल रायडर्स महाराष्ट्र ,नाशिक या बुलेट ग्रुपचे आयोजक राजू रवींद्र रुपवते यांनी अंजनाला आपल्या ग्रुप सोबत न्यायची जबाबदारी घेऊन मोहिम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.याआधी अंजनाने पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या ६ तासात मॉडिफाय केलेल्या ऍक्टिव्हा या गाडीने पार केले होते.या “रायडर मेनिया गोवा २०२२”मध्ये सहभागी आयोजक राजु रवींद्र रुपवते,राजु जाधव, जमीर सय्यद, शरद रोकडे, सुरेश सरदार,विद्याकांत कुलकर्णी,परिमल शर्मा,भूषण कुरणेकर,आकाश गाडे,प्रमोद गायकवाड,अमोल कांबळे,प्रशांत शिंदे,बाबूजी शेख,संतोष पौडवाल
गोपीकृष्ण पौडवाल,रामदास घोडेकर,
समीर मुळे,सारिका मुळे,सुयोग मुळे, अंजना प्रधान,आदी सहभागी झाले होते.संपूर्ण राज्यातून अनेक रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते.यासाठी तीला सक्षम व प्रहार अपंग क्रन्ति संघटना, राष्ट्रीय नाभिक संघटना, शिवऊर्जा प्रतिष्ठान, गरुडझेप,यांच्या शुभेच्छा लाभल्या.