नाशिक त्रंबक रोड वरील एबीपी सर्कल ला अपघात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू दोन पुरुष जखमी तसेच चार महिला देखील जखमी.
जमावाने दिला कारणीभूत चालकाला प्रसाद.
नाशिक जनमत नाशिक त्रंबक रोड वरील एबीबी सर्कल येथे काल रात्री एक अपघात झालेला आहे या अपघातांमध्ये चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर चार महिला व दोन पुरुष देखील जखमी झालेले आहे अपघात खूप भीषण होता अपघातचा आवाज ऐकताच अनेक नागरिक घराबाहेर आले यावेळी नागरिकांनी अगोदर अपघातग्रस्त कारमधील जखमी नागरिकांना बाहेर काढले व ताबडतोब सिव्हल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले या अपघातामध्ये एम एच 15 डीसी 97 46 व विटारा ब्रेजा एम एच 15 जी 34 61 या दोघां वाहनामध्ये जोरदार धडक झाली. चार वर्षीय बालक राज दिन पठाडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे यावेळेस नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती अपघात ग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळेस वाहन चालकाने जोरदारपणे वाहन चालवल्याने अपघात झाला त्या वाहन चालकास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला दरम्यान या ठिकाणी पोलिस कर्मचारी हजर नसल्याने नाराजी व्यक्त केली रात्री सिग्नल बंद असल्याने अनेक वाहनचालक जोरदार वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहे तसेच अनेक ठिकाणी या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची संख्या वाढलेली आहे अधिक तपास गंगापूर पोलिस करत आहे