प्रभाग क्रमांक 30 मध्ये नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांच्यामार्फत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना .

“”नाशिक जनमत वृत्तसेवा प्रभाग क्रमांक 30 मध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे दरम्यान काही सोसायट्यांना पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याचे टँकर देखील मागावे लागतात त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो दरम्यान प्रभागाचे नगरसेवक सतीश बापू सोनवणे व श्री शाम बड दे र्यानी पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा बैठक घेऊन देण्यात आला लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे यावेळेस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले सिडको सह अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या सध्या बिकट होत चाललेले आहे दरम्यान प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक सतीश बापू सोनवणे हे प्रभागांमध्ये आदर्श नगरसेवक ठरत आहे नागरिकांच्या कोणत्याही समस्या असतील किंवा दुःख सुख असेल तर ते नेहमी मतदारांमध्ये सहभागी होऊन समस्या सोडवत असतात एक आदर्श नगरसेवक म्हणून प्रभागात प्रसिद्ध आहे लवकरात लवकर पाण्याची समस्या मिटेल अशी नागरिकांना आशा आहे.