ब्रेकिंग

अहमदाबाद वरून लंडनला जाणारे विमानाचा अपघात. विमानात 232 प्रवासी

नाशिक जन्मत    अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला असून मोठी दुर्घटना घडली आहे. विमानाचा मागचा भाग झाडाला लागून आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विमान उड्डाण करत असताना ही घटना घडल्याचे

 

 

सांगण्यात येत आहे. आज दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे अतिशय मोठी दुर्घटना आमदाबाद एअरपोर्टवर घडले आहे. माजी मुख्यमंत्री विजय सुपारी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे

 

 

पार्ट आजूबाजूला विखरले आहेत. विमान हे इमारतीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मोठे जीवित हानी झाल्याचे वृत्त येत आहे. घटनास्थळावर बचाव कार्य चालू आहे. अमित शहा यांनी अपघाताची माहिती मागितलेली आहे. एअर इंडियाचं 787. 8  ये विमान कोसळला आहे. या विमानामध्ये

 

 

300 प्रवासी बसू शकतात. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आमदाबाद विमानतळावर धुराचे लोट दिसून येत आहे परिसरातील अनेक वाहन जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान लंडन येथे जात असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन टाकीमध्ये होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. अमित शहा यांची गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर अपघाता विषयी माहिती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

विजय रुपानी हे माजी मुख्यमंत्री याच विमानात प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एन डी आर एफ चे तीन पथक गांधीनगर वरून रवाना झाले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे