राष्ट्रीय जयंती उत्सव समिती पदाधिकारी निवड.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती पदाधिकारी निवड
नाशिक जनमत. राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शशिकांत घुगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी भगुर , नाशिक येथे
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी नियुक्त्या करणेत आल्या आहेत.
धर्मवीर विक्रम सुदाम नागरे ( नाशिक ) यांची राष्ट्रीय अध्यक्ष ( युवा आघाडी ) पदी नियुक्ती करणेत आली. ग्रामसेवक संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष ( महाराष्ट्र राज्य ) ,शिक्षण सम्राट श्री एकनाथ राव ढाकणे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. चित्रपट निर्माते श्री रवींद्र फड यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ( चित्रपट आघाडी ) या पदावर निवड करण्यात आली आहे. बाप कंपनी चे अध्यक्ष रावसाहेब घुगे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ( उद्योग आघाडी ) पदावर नियुक्ती पत्र देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सांगळे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष
श्री. शशिकांत घुगे, सचिव तुकाराम सांगळे, कार्याध्यक्ष नामदेव सानप, खजिनदार श्री. शामराव गिते, उपाध्यक्षा मायाताई बुरकुल , यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी राज्य प्रदेशाध्यक्ष ( शेतकरी आघाडी ) भाऊसाहेब सानप, प्रदेश संघटक श्री. रावसाहेब कांगणे , प्रदेश संपर्क प्रमुख मीराताई सानप , नांदगाव तालुका शिवसेना उपप्रमुख दिनेश केकान आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.