नासिक मध्ये गुन्हेगारी चे वाढते प्रमाण. पोलिसांची गस्त कमी. सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून चेन, अंगठी लांबवली

”
प्रतिनिधी । नाशिक जन्मत नासिक शहर परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस अधिकारी असल्याचे सांगत वयस्कर लोकांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. आता तर नाशिक शहरात सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून चैन अंगठी लांबवली आहे पंचवटीतील दत्त नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून चाकू मारून अंगावरील सोने चोरी केले जात असल्याचे सांगून पायी जाणाऱ्या इसमाचे १ लाखाची – सोन्याची चेन, अंगठी काढून घेत फसवणूक करण्यात आली. दत्त मंदिर, दत्तनगर, पंचवटी येथे हा प्रकार घडला. पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि – मनोहर दुमणे (रा. दत्तनगर, – पंचवटी) यांनी दिलेल्या न तक्रारीनुसार, सकाळी १० वाजता दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन अनोळखी इसमांनी संगनमत करत दुमणे यांना जवळ बोलावून आम्ही सीबीआय ऑफिसर आहोत असे सांगितले. या परिसरात गळ्याला चाकू मारून अंगावरचे सोने चोरी होत आहे. तुम्ही अंगावरचे सोन्याची चेन व अंगठ्या काढून ठेवा असे सांगितले. दुमणे यांनी सोन्याची चेन, अंगठ्या काढून रुमालात ठेवा असे सांगत मदत करण्याचा बहाणा करत काढून घेतल्या. घरी गेल्यानंतर दमणे यांच्या लक्षात आले. नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये दररोज अशा घटना घडत असून पोलिसांची गस्त कमी पडत आहे. पोलीस आयुक्तांनी या सर्व घटनांची दखल घेऊन बीट मार्शल संख्या वाढावी अशी मागणी जनता करत आहे.
–
दुसऱ्या एका घटनेत
(अन्नदान सुरू असल्याचे सांगत दागिने लांबवले
सुमन काकड (रा. रामनगर, मोरे मळा मखमलाबादरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ९ वाजता भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केट यार्ड येथे पायी जात असताना पेठनाका येथील सिग्नलवर आल्या असता दोन अनोळखी इसमांनी काकड यांच्या जवळ येऊन आजी रस्त्याच्या त्या बाजूला अन्नदान करीत आहे. तुम्हाला देतो असे सांगत रस्त्याच्या पलीकडे मुक्ताई ट्रेडर्ससमोर घेऊन जात तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र, डोरले आणि कानातले टाप्स काढून ठेवा. नाही तर अन्नदान मिळणार नाही असे सांगितले. काकड यांनी सोन्याचे दागिने कापडी पिशवीत. टाकून ती पिशवी प्लास्टिकच्या पोत्यात गाठ मारून ठेवा असे सांगितले. काकड पिशवी गोणीत ठेवत असताना संशयितांनी हातचलाखीने दागिने काढून घेतले.
घरी आल्यानंतर प्रकार लक्षात आला.)
आले. ढुमणे यांचे बंधू निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. नवस