नवीन गॅस लाईन खोदकाम मुळे स्मार्ट नाशिक शहर खड्डेमय.
पाईपलाईन फोडून पुन्हा जोडण्यासाठी सोसायटी कडे मागितले जातात पैसे. पाण्याविना नागरिकांचे हाल.

नाशिक जनमत नविन नाशिक भागात एमएनजीएल गैस पाईप लाईन टाकायचे काम गेल्या 2 ते 3 वर्षापासुन सुरु आहे, रस्ता फोडुन गैस पाईप लाईन टाकुन झाल्यानंतर ते प्राथमिकता त्वरीत बुजवने व संपूर्ण राडारोडा साफ करणे हे बंधनकारक आहे. असा राडारोडा, मातीचे ढिगारे, चांगले डांबरी रस्त्यावर माती जशीच्या तशी सोडुन देतात. त्यामुळे रस्ता रहदारीस वहातुकीस अडचणी येत असतात व लहान मोठे अपघात देखील होत असतात. उत्कर्ष हाँल, विजयनगर येथे असाच मातीचा ढिगारा, राडारोडा गेल्या 6 महिन्यांपासुन पडलेला आहे. कोणीही गैस कंपनीचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी ह्याकडे लक्ष देत नाहीत. जनतेला वेठीस धरण्याचे काम सर्हास चालु आहे. प्रशासन ह्याकडे गांभिर्यांने बघणार आहे कि नाही हा प्रश्न पडतो. सिडकोतील डीजेपी नगर दोन भागातील श्री हरेश्वर आपारमेंट मध्ये येणारी पाईपलाईन ज्याच्या खोदकाम करणाऱ्यांनी कर्मचारी व जेसीबीने फोडली होती दरम्यान ती पाईपलाईन जोडण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली गेली. तीन दिवस बिगर पाण्याचे राहून शेवटी सोसायटीतील नागरिकांनी पाच हजार रुपये दिल्यानंतर पाईपलाईन मेन लाईनला जोडून देण्यात आली काम गॅस पाईपलाईनचे परंतु आर्थिक भूरददड सोसायटी तीलनागरिकांना बसला असल्याचे प्रकार घडला आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत पावसाचे वातावरण असून पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात. महानगरपालिकेने या सर्व प्रकाराकडे लक्ष देणे महत्वाचे झाले आहे.