डिलिव्हरी बॉय ने रेकी करून घरफोड्या केल्या 80 लाखाचा मुद्देमाल जप्त..सोन्या चांदी हिरे पैसे चोरले.

नाशिक जनमत मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना नाशिकसह पुणे येथे वाढले आहेत. चोर विविध प्रकारे सशकल लढवत चोऱ्या करत आहेत. पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉय ने रेखी करत 80 लाख रुपयाच सोने चांदी हिरे चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
डिलिव्हरी बॉय म्हणून विविध सोसायट्यांत जाऊन रेकी करून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा स्वारगेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे शहरातील सुमारे १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करत आरोपींना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील घरफोडी करणारा गुन्हेगार उंड्री परिसरात ओळख लपवून राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार गणेश मारुती काठेवाडे (३७, रा. मुखेड, नांदेड) यास अटक करून त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ८६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १५० हिरे, साडेतीन किलो चांदी, दोन पिस्तुले, ५ जिवंत राउंड, एक दुचाकी, घरफोडी करण्यासाठी
वापरण्यात येणारे साहित्य असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तंना पाटील व एसीपी राहुल आवारे यांनी दिली आहे.
गणेश काठेवाडे, सुरेश पवार (३०५, रा. बालाजीनगर, पुणे) आणि अजय राजपूत (३९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काठेवाडे डिलिव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांत जाऊन रेकी करत होता. त्याने पुण्यात एकूण १४ घरफोड्या केल्या असून स्वारगेट एसटी स्टँड येथे ७ चोऱ्या केल्या आहेत. मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या तसेच खून व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी सुरेश पवार याच्याकडे त्याने चोरीचे दागिने दिल्याचे पोलिसांना समजले. यासाठी आरोपी व्यावसायिक भीमसिंग राजपूत याने मध्यस्थी केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले.