महाराष्ट्र

औद्योगिक कीर्तनकार डॉ संदीप भानोसे ह्यांना IWAF चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 औद्योगिक कीर्तनकार डॉ संदीप भानोसे ह्यांना IWAF चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  14 फेब्रुवारी 2023, मंगळवार रोजी ठाणे येथील , काशिनाथ घाणेकर सभागृह येथे दुपारी ४ वाजता IWAF (इमेज वेल्फेर एचीव्हार फोरम ) संस्थेच्या वतीने

उद्योग जगतात नाविन्यपूर्ण कीर्तने करून परिवर्तन घडविल्या बधल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

डॉक्टर संदीप भानोसे यांनी उद्योगात नाविन्यपूर्ण कीर्तने करून परिवर्तन घडविले आहे. अनेक उद्योगात गुणवत्ता उंचावली आहे , उत्पादक्त्ता वाढली आहे ,

सुरक्षितता ह्या बाबत जाणीवा वाढल्या आहेत तसेच मालक – कामगार संबंध सकारात्मक झाले आहेत .

गेली २५ वर्षे डॉ भानोसे उद्योग क्षेत्रात विविद विषयांवर कीर्तनातून प्रबोधन करत आहेत .

आज ८५० पेक्षा अधिक उद्योगात जसे टाटा , महिंद्र , बजाज , एल &टी , क्रोम्प्तन ,वीज मंडळ , महाराष्ट्र शासन पाणी विभाग ,

 परिवहन मंडळ , आयुर्विमा , बँका , हॉटेल , हॉस्पिटल ,पोलीस विभाग इत्यादी मध्ये कीर्तने करत सकारात्मक परिवर्तन घडवत आहे .

 १९९८ मध्ये मंत्रालयात ,” उर्जा बचत “ ह्यावर अनेक मंत्र्यांसमोर कीर्तन व भारुड सादर केले .

मुख्यमंत्री मनोहर जोशींना ते खूप भावले व त्यांनी ,” औद्योगिक कीर्तनकार “ हि उपाधी बहाल किली .

 आज शेकडो उद्योगात सकारात्मकता , ध्येय निश्चिती , ताण – तणाव व्यवस्थापन ,

प्रेरणा , संघटन बांधणी , नेतृत्व विकास , संवाद कौशल्य , सृजनशीलता ,

जपानी व्यवस्थापन , कायझेन , उत्पादकता सुधार , गुणवत्ता विकास , सुरक्षितता इत्यादी विषयांवर

कीर्तनातून परिवर्तन होत आहे . पुणे विद्यापीठात ह्यावर संशोधन हि होत आहे .उद्योगात कीर्तनाचा कसा व किती परिणाम होतो .

परिवर्तन होण्यासाठी काय काय करावे लागत आहे .

पुढे गरुडावर संशोधन केले व त्याचे ७२ गुण शोधून काढले .त्यातील ४० गुण अनेक राष्ट्रीय पुरुषात

अर्थात छत्रपती शिवाजी महाराज , वीर सावरकर , स्वामी विवेकानंद ,डॉ आंबेडकर इत्यादी मध्ये शोधले

व हे गुण – दुर्दुर्ष्टी , नियोजन , निर्णय , प्रामाणिकपणा , बुद्धी , सुरक्षा ,

परस्पर संबंध , प्रेरणा , अहंकार ,नेतृत्व , सृजनशीलता ,वेळेचे भान , राग ,

 प्रगल्भता ,स्वीकार , वात्सल्य इत्यादी महत्वाच्या व्यक्तिमत्वातील गुणांचे टक्के काढून देत आहे .

 पूर्वी अधिकारी वर्गाची नियुक्तीसाठी फक्त शिक्षण व अनुभव पाहिले जात .

डॉ भानोसे ह्यांनी त्यात ह्या परीक्षणामुळे स्वभाव गुण हि जोडला .

त्यामुळे अनेक जण परीक्षण करून घेतात व स्वतः मधील गुण – दोष समजून घेत स्व विकास करत प्रगती करत आहेत

 .आता विद्यार्थी वर्गासाठी हि अशीच व्यक्तिमत्व चाचणी करून देत त्यांना शास्त्रीय पद्धतीने करियर मार्गदर्शन करत आहे .

युवा वर्गास ह्याचा खूप फायदा होत आहे .

पूर्वी आपल्यातील गुण माहित नसल्याने मुले कोणत्याही क्षेत्रात जात व अपयश आल्याने निराश होत

परंतु आता शास्त्रीय विशेल्षण कळल्याने ते योग्य दिशने जात आहे व स्वतः मध्ये सकारात्मक परिवर्तन करत आहे .

त्यानातर उद्योगात कीर्तन सुरु असताना गरुडझेप प्रतिष्ठानची स्थापना केली व त्या माध्यमातून सामाजिक कार्य करत राहिलो .

आज पर्यत १५०० महाविद्यालये व ५०० + शाळेत गरुडझेप कार्याशाले घेतल्या आहेत .

उद्योग , महाविद्यालये व शाळा मिळून आज पर्यंत 15 लाख लोकांना प्रशिक्षण दिले आहे .

शेतकरी वर्गास प्रेरणा देण्यासाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी हि अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत .

महिला सबलीकरण ह्यावर अनेक बचत गटांना मार्गदर्शन केले आहे .

युवा वर्गाने नोकरीच्या मागे न लागता उद्योग निर्मित्ती करावी ह्यासाठी उद्योजकता वर अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत .

भारत सरकारच्या सैन्य दलासाठी हि काही विशेष कार्यशाळा घेतल्या आहेत .

अनेक सामाजिक संस्थांसाठी हि कार्यशाळेतून मार्गदर्शन करत आहे .

स्त्री बृहन हत्या , पर्यावरण रक्षण , वृक्षारोपण , व्यास मुक्ती , प्ल्यास्तिक मुक्ती , स्वच्छता इत्यादी उपक्रम राबवीत आहे .

गेली 1760 दिवस नासिक मध्ये वाहतूक सुरक्षेवर प्रबोधन करत आहे .

पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल ह्यांनी विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे .

10 जागतिक विक्रम नोंदविले गेले आहेत .

शेकडो पुरस्कार व गौरव पत्रे मिळाली आहेत – राष्ट्रीय सुरक्षा विभाग , निपम , टाटा उद्योग ,

 महाराष्ट्र उद्योगाक्ता विकास केंद्र पुरस्कार , एच ए एल पुरस्कार , AIMA पुरस्कार , समाजरत्न पुरस्कार इत्यादी

गेली अनेक वर्षे गडकोट भ्रमंती व संवर्धनाचे पवित्र कार्य करत आहे .

६५ स्वच्छता व संवर्धन मोहिमा यशस्वी केल्या आहेत .अनेक गडकोटांवर दारूच्या बाटल्या ,

 प्ल्यास्तिक व कचरा गोळा केला आहे .अनेक टाके साफ केली आहेत व जल संधारण कार्यात हातभार लावला आहे ,

 बुरुजांवरील झाडे काढली आहेत , विद्रूप लिखाण मिटविले आहे , मार्गदर्शक फलक लावले आहेत ,

तोफा सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत , गडावरील मार्गातील अडथळे दूर केले आहेत .

अश्या प्रकारे गरुडझेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज सेवा करत आपले सामाजिक भान जोपासत भारत समर्थ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे