अंबड परिसरात चोरीसाठी आलेल्या चार जणांना अटक..
नाशिक जनमत. अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार सराई त चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून धारदार हत्यार सह मिरचीची पावडर जप्त केली आहे. नागरिकांच्या सुविधा साठी असलेल्या 112 या क्रमांकावर एक कॉल आला त्यात असे सांगितले की अंबड औद्योगिक वसाहतीत पाच ते सहा व्यक्ती हत्यारे घेऊन फिरत आहे. असे अज्ञात व्यक्तीने कळवले पोलिसांनी दखल घेत ताबडतोब घटनास्थळावर पोहोचले यावेळी त्यांना संशयित पळून जात असल्याचे दिसले गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे vतसेच सहकारी यांनी संशयित यांची विचारपूस करत असताना त्यांनी पळ काढला दरम्यान पोलिसांनी पळत जाऊन त्यांना अटक केली या दोन जण पळून गेले अंबडगाव येथील करण अण्णा कडू सकर व व कोपरगाव येथील सतीश बबन माने राहणार दत्तनगर चिंचाळे नाशिक विठ्ठल सुदाम गवारे घरकुल चुंचाळे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्याकडून स्टील चापर लोखंडी कोयता लोखंडी कट वाणी.स्कु ड्रायव्हर लाल मिरचीची पूड असलेली पुडी जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. अजूनही जास्त मोठ्या प्रमाणात नाशिक शहरातील अंबड परिसरामध्ये वाढावी व गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक बसावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.