स्वातंत्र्याचा अमृत महा उत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण.
दि. 14 जून, 2022
*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण*
*नाशिक, दि. 14 जून ,2022 नाशिक जनमत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास प्रादेशिक विभागीय अधिकारी सु. सा चौधरी, अपर आयुक्त भानुदास पालवे, उपायुक्त(सा. प्र,) रमेश काळे , उपायुक्त (महसूल) गोरक्षनाथ गाडीकर, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार, उपायुक्त (नगरपालिका प्रशासन) संजय दुसाणे, उपायुक्त (विकास) ज्ञानेश्वर शिंदे, विभागीय वन अधिकारी चंद्रकांत भारमल, तहसिलदर नरेश बहिरम, तहसिलदार (महसूल) महेश चौधरी, साहेबरात सोनवणे, अनिल पुरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभाग नाशिक यांच्या सहकार्याने दीडशे रोपे, महानगरपालिका नाशिक यांनी सेंद्रिय खते व वृक्ष जाळ्या उपलब्ध करून दिल्या तर महसूल विभागाने खते, चांगल्या प्रकारची माती व खड्डे खोदून दिले. वृक्षारोपणात जांभूळ, पुत्रांजिवा, आवळा, चिंच, लिंब, कदंब, मुचकुंद, हनुमान फळ आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली.
यावेळी विभागीय कार्यालयातील अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वृक्षारोपण केले.