ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब यांनी जळगाव कॅन्सर केअर व रेडिएशन सेंटर ला सदिच्छा भेट दिली.
नाशिक जनमत. *जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब यांनी जळगाव कॅन्सर केअर व रेडिएशन सेंटर ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सेंटरला नुकतीच प्राप्त झालेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचिही सुरुवात फीत कापून केली. याप्रसंगी सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर योगेश चौधरी व डॉक्टर नितीन चौधरी त्याचप्रमाणे रेडिएशन
अंकलॉजिस्ट डॉक्टर अर्पित गीते सर हे उपस्थित होते. जळगाव जिल्हा व परिसरतील नागरिकांना या सेंटरचा होणारा फायदा व योजनेअंतर्गत होणारे मोफत उपचार याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त करून सेंटर करीत असलेल्या कामाबद्दल गौरव उदगार काढले. रुग्णांनी मोठ्या प्रमाणात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा असे सेंटर तर्फे सांगण्यात आले आहे.