नासिक येथील रणजी सामन्यांमध्ये महाराष्ट्राचा ४३९ धावांनी बडोद्यावर विजय शतकवीर सौरभ नवले ठरला सामनावीर.

: महाराष्ट्राचा ४३९ धावांनी बडोद्यावर विजय
शतकवीर सौरभ नवले ठरला सामनावीर
नाशिक जन्मत प्रतिनिधी । नाशिक मधील गोल क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान चा सामन्यात महाराष्ट्र संघाने एकतर्फी सामना जिंकला याबाबत सविस्तर वृत्तांत असा की
नाशिककरांसाठी हा सामना खूप मेजवानी ठरला सुट्टी शनिवार आणि रविवार मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नाशिकच्या तरुण युवा ज्येष्ठ नागरिक महिला युवती यांनी या क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला. नासिकच्या लाडक्या रघु घोष यांचे एक धावणे शतक हुकल्याने नाशिकच्या प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून आली.महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्यावर ४३९ धावांनी विजय मिळवला. महाराष्ट्राकडून सौरभ नवलेने पहिल्या डावात सर्वाधिक ८३ व दुसऱ्या डावात नाबाद १२६ धावा करत मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे तो सामनावीर ठरला. बडोद्यासमोर विजयासाठी ६१७ धावांचे आव्हान होते. पण महाराष्ट्राच्या भेदेक गोलंदाजीसमोर हा संघ केवळ ३६ षटकेच टिकू शकला. मुकेश चौधरीचे ५ तर रजनीश गुरबानीचे तीन आणि रामकृष्ण घोषचे दोन बळी महाराष्ट्राच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले. या रणजी हंगामात एलिट ए ग्रुपमध्ये प्रथम स्थानी असलेल्या बडोद्यास धूळ चारल्याने महाराष्ट्रासाठी नाशिकचे मैदान खऱ्या अर्थाने लकी ठरले.
महाराष्ट्राने दुसरा डाव ७ बाद ४६४ या धावसंख्येवर घोषित केला. यामुळे बडोद्याससमोर अंतिम दिवसातील ९० षटकांत ६१७ धावांचे मोठे आव्हान होते. पहिल्या डावाप्रमाणेच महाराष्ट्राच्या भेदक जलदगती गोलंदाजीसमोर बडोद्याचा डाव केवळ ३६ षटकांवरच आटोपला. दुसऱ्या डावातही नाशिकच्या रामकृष्ण घोषने बडोद्याचा कर्णधार कृणाल पंड्याचा
महत्त्वाचा बळी मिळवला. वैयक्तिक तिसऱ्याच व डावाच्या १६ व्या षटकात रामूने एका बाजूने खेळत ४० धावा केलेल्या सलामीवीर जोस्निल सिंगला
पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने उत्तुंग षटकार ठोकला. पण त्याच षटकातील ५ व्या चेंडूवर केवळ ४ चेंडूत कृणाल पंड्याला बाद करत एकाचं षटकात दुसरा धक्का देत सामना
वाचवण्याच्या बंडोद्याच्या अपेक्षा संपवल्या. १५.५ षटकांतच पाहुण्या संघाची ५ बाद ७६ अशी अवस्था होती. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अतीत सेठने सर्वाधिक ५१ धावा केल्या. नासिक मध्ये रणजी ट्रॉफी सामने नेहमी व्हावेत अशी मागणी यावेळेस अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखवली.