ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अँड सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांना दिल निवेदन.

  • नाशिक जनमत दिनांक ०७/०९/२०२२ रोजी म.न.पा.चे उपायुक्त श्री.चव्हाणके साहेब यांना राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली शिष्टमंटळाने पंचवटी परिसरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले.

सदरील निवेदनात म्हटले आहे की,

नाशिक हा धरणांचा जिल्हा असुन देखील नाशिक शहराची अवस्था काही दिवसांपासून धरण उशाला व कोरड घशाला अशी झालेली आहे.नाशिक शहरात कमी दाबाने व केवळ एकच तास अनियमित पाणी पुरवठा होत असुन पाण्याची बिले माञ सर्वांना मोठ्या प्रमाणात येत आहे.शहरात लोकवस्ती वाढलेली असुन मोठमोठ्या इमारती,अपार्टमेंट उभ्या राहिल्या आहेत.माञ त्यांना पाण्याचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने अनेकदा खाजगी टॅंकर्स ने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तरी किमाण दोन तास व दोन वेळी पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात यावा.शहरात रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्याने दिवसागणिक अपघातांमधे वाढहोत असल्याने अशी खड्डि डांबराणे बुजविण्यात यावी. शहरातील अनेक व्रुक्ष धोकादायक रीतीने वाढलेली असल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहाणी होण्याची शक्यता असल्याने व्रुक्ष छाटणी करण्यास सुलभ रीतीने परवानगी देण्यात यावी. डासांच्या प्रमाणात वाढ झाल्याने डेंग्यु सद्रुष्य रुग्णांमधे वाढ होत असल्याने औषधे व धुरफवारणी नियमितपणे करण्यात यावी.घंटागाडी व झाडपाल्याची वाहने नियमित पणे उपलब्ध करण्यात येऊन शहरातील ब्लॅक स्पॅाट बंद करण्यात यावे.

पंचवटी विभागातील म.न.पा.कार्यालयात अनेकदा तक्रारदारास कर्मचारी व अधिकारी भेटत नसल्याने त्यांना नियमित कार्यालयात उपलब्ध करुन देण्यता यावे.

पंचवटी मधील काकडमळा,सत्यदेव नगर,पवारमळा,ओम नगर, शांतीनगर,विद्यानगर,समर्थ नगर,तुळजाभवाणीनगर आदी परिसरातील पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा.सदरील ठिकाणच्या रस्ते वाहून गेलेले असुन त्वरित खडीकरण मंजूर करण्यात येऊन रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी.गजानन कॅालनी,क्रांतिनगर,हनुमानवाडी येथे टाकण्यात आलेली पाण्याची नविन लाईन सुरु करण्यात यावी.

सत्यदेव नगर,तांबे बोर्हाडे मळा,तवलीफाटा येथे त्वरित नव्याने पथदिपे बसविण्यात यावी.आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ॲड.सुरेश आव्हाड,बन्सिलाल भागवत,तुषार जाधव,अनिल बंकापुरे,शशिकांत तनपुरे,राजेंद्र शार्दुल,शशिकांत पाटील,प्रशांत बर्डे,राहुल कालेकर,विनिता राव,अतुल गायकवाड,हाजि मोहिय्योद्दीन शेख,नासिर पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे