खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांची वाहतूक तपासणी नाक्यांना भेट देऊन पाहणी

खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांची
वाहतूक तपासणी नाक्यांना भेट देऊन पाहणी
नाशिक, दि. २८ (जि. मा. का. वृत्तसेवा) : २१ नाशिक मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी नाशिक पश्चिम, देवळाली व इगतपुरी या विधानसभा मतदार संघातील सर्व वाहतूक तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. इगतपुरी येथील भेटीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसीलदार अभिजीत बारावकर, संपर्क अधिकारी विजयकुमार कोळी उपस्थित होते.
यावेळी श्री. श्रीवास्तव यांनी त्या त्या ठिकाणी सुरू असलेली वाहनांची तपासणी कार्यवाहीची पाहणी केली. मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार वाहनांची सक्तपणे तपासणी करण्याच्या सूचना करून खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव म्हणाले, एखाद्या वाहनात रक्कम रुपये ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम आढळल्यास संबंधित सहायक खर्च निरीक्षक याना तात्काळ अवगत करावे. तसेच मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काटेकोरपणे कारवाई करण्याच्या सूचना त्यानी यावेळी दिल्या.
तपासणी नाक्यांची पाहणी केल्यानंतर श्री. श्रीवास्तव यांनी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक खर्च निरीक्षक यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्य