सिडकोतील खुटवड नगर येथे इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला आग.स्लॅब कोसळला.

नाशिक जनमत. शहरातील खुटवड नगर येथे एका इलेक्ट्रॉनिक्स शोरूम ला वेल्डिंग चे काम सुरू असताना लागलेल्या आगीत शोरूम मधील लाखोचे साहित्य जळून खाक झाले. आग इतक्या वेगात पसरली होती की दुकाना चां स्लॅब कोसळला आग लागतातच सिडको सातपूर बिडी कामगार नगर व मुख्य अग्निशामक दलाच्या पाच बंबाच्या मदतीने जवानांनी एक तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान नाशिक शहरांमध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहे याबाबत अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार खुटवड नगर मधील शोरूम मध्ये शनिवारी दुकानात बिल्डिंगचे काम सुरू होते बिल्डिंग करताना ठिणगी उडून ती मॅटवर पडली आणि जोराची आग लागली काही वेळातच आगविणे रुद्ररूप धारण केले अग्निशामक दलाच्या जवानांनी एक ते दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा
चंद्रकांत धात्रक. नाशिक जनमत संपादक.फोन 9273020944.
दुकान मालकाला चक्कर आली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वेळीच नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूच्या इमारती ला बाधा निर्माण झाली नसल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले या घटनेनंतर परिसरात वीस पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता दरम्यान या भागातील नागरिकांन मध्ये घबराट पसरली होती. आग लागल्यामुळे या भागांमध्ये एकेरी वाहतूक चालू होती काही काळ हा रस्ता बंद करण्यात आला होता