चांदवडच्या राहुल घाटात अपघात.आठ जण ठार झाल्याची. भीती. नाशिक जिल्हा हदरला.

नाशिक जनमत. आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान चांदवड येथील रेणुका माते मंदिराच्या समोर राहुड घाटात एका ट्रकने एसटी बसला मागून जोरदार धडक दिली ट्रक घासून गेल्याने एसटी बस मधील आठ प्रवासी जागीच ठार झाल्याची भीती निर्माण झालेली आहे. तर अनेक जण जखमी झालेले आहेत सर्व जखमी व मृत्यू झालेले यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे. अतिशय भीषण अशी ही दुर्घटना आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडले आहे. आणि जखमी मदतीसाठी धाव धाव करत होते एसटी चां पत्रा कापून ट्रक भरून गेल्याने प्रवासी गंभीर जखमी झाले. बस वसई वरून जळगाव कडे जात असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक मधील पवन नगर तसेच देवळा भागातील व एक जण पारोळा भागातील असल्याची सूत्राची बातमी आहे या घटनेने नाशिक जिल्ह्यावर दुःखाची शोक काळा पसरली आहे.
रस्त्यावरील इतर वाहनातील नागरिकांनी थांबत जखमींना ताबडतोब मदत केली व दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. अधिक तपास पोलीस करत आहे जखमींची संख्या मोठी नऊ जण सिरीयस असल्याची बातमी आहे.