प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने निवडणूक कामकाजाची* *जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी* *: जिल्हाधिकारी जलज शर्मा*

*प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने निवडणूक कामकाजाची*
*जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी*
*: जिल्हाधिकारी जलज शर्मा*
*नाशिक, दिनांक 21 फेब्रुवारी, 2024 वृत्तसेवा) :* आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची प्रक्रिया व प्रत्यक्ष निवडणूक सुरळीत व शांततेच्या वातावरणात होणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने निवडणुकीचे कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमिवर निवडणुकीच्या विविध कामांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणुकीच्या काम करतांना दिलेल्या जबाबदारी नुसार आवश्यक मनुष्यबळाची व साधनसामग्रीची मागणी करण्यात यावी. तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी दिले.
या बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हिएम व व्हिव्हिपॅट व्यवस्थापन, निवडणूक दरम्यान वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रशिक्षण, मीडिया प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती या विषयांबाबत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी सविस्तर मार्गदर्शन केले