नाशिक ते भगवान गड शिवशाही बस सेवा सुरू होणार.

नाशिक ते भगवान गड शिवशाही बस सेवा सुरू
नाशिक ते भगवान गड शिवशाही बस सेवा व्हाया सिन्नर, नांदुर शिंगोटे, निमोन, तळेगाव,लोणी,श्रीरामपूर व पाथर्डी मार्गे दि.२९ फेब्रुवारी २०२४ पासुन सुरु होत आहेत. सदर बस नाशिक येथून सकाळी ६ वाजता निघणार असून दुपारी १ वाजता भगवान गड येथे पोहचेल व पुन्हा दुपारी २ वाजता भगवान गड येथून परतीचा प्रवासा साठी निघेल व रात्री १० वाजता नाशिक येथे पोहोचणार आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील भगवान बाबा यांना मानणारा खूप मोठा भाविक वर्ग आहेत. त्यांना भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट एस. टी . बस सुविधा उपलब्ध नव्हती.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती ( वंजारी समाज) यांनी वरील समस्या सोडवणेसाठी नाशिक परिवहन विभागाला निवेदन देवून गेल्या एक ते दिड महिना सतत पाठपुरावा करून नाशिक ते भगवान गड शिवशाही बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती. राष्ट्रीय जयंती उत्सव समिती च्या मागणीप्रमाणे परिवहन विभागाने नाशिक ते भगवान गड शिवशाही बस सेवा सुरू करणेची रीतसर परवानगी दिली असून पहिली बस २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन शुभारंभ करून रवाना होणार आहेत. पहिल्या फेरीत राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे सर्व पदाधिकारी भगवान बाबांचे दर्शनासाठी भगवान गड येथे जाणार आहेत.सदर बससाठी ऑनलाईन बुकींग सुविधा उपलब्ध असणार आहेत. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती च्या वतीने विनंती करण्यात येत आहेत.
समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे, राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप,राष्ट्रीय कोष्याध्यक्ष शामराव गिते,नाशिक येथील समितीचे पदाधिकारी कैलास कराड, मायाताई बुरकुल, वैशाली कराड, सतीश तिडके व नाशिक जिल्हाध्यक्ष विनोद केकान यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे यांनी नाशिक जन्मत शी बोलताना दिली.