१९ वर्षां खालील महिलांची फ्रेंडशिप ट्रॉफ एन डी सी ए गर्ल्स चा दहिसर स्पोर्ट्स वर विजय
१९ वर्षां खालील महिलांची फ्रेंडशिप ट्रॉफ
एन डी सी ए गर्ल्स चा दहिसर स्पोर्ट्स वर विजय
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैभवी बालसुब्रमणीयम व प्रचिती भवर यांची छायाचित्रे
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे सरू झालेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षां खालील महिलांच्या फ्रेंडशिप ट्रॉफीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एन डी सी ए गर्ल्स संघाने दहिसर स्पोर्ट्स क्लबवर ४३ धावांनी विजय मिळवला. नाशिकच्या प्रचिती भवर व वैभवी बालसुब्रमणीयम या विजयाच्या प्रमुख शिल्पकार ठरल्या.
मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न दहिसर स्पोर्ट्स क्लब पॉवर्ड बाय नवनीत फाउंडेशन हा संघ या फ्रेंडशिप ट्रॉफी अंतर्गत , एकदिवसीय ४० षटकांचे मर्यादित एकूण तीन व दोन टी-ट्वेंटी सामने अशी मालिका खेळण्यासाठी नाशिक येथे दाखल झाला आहे. संघाबरोबर अतिशय ज्येष्ठ व पूर्ण तंदुरुस्त ७३ वर्षीय दहिसर स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी प्रवीण गोगरी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत.
पहिल्या एकदिवसीय ४० षटकांच्या मर्यादित सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या एन डी सी ए गर्ल्स संघाने सलामीच्या प्रचिती भवर ४९ व निकिता मोरेच्या २७ धावांच्या जोरावर ३९.५ षटकांत सर्वबाद १७६ धावा केल्या . रागिणी सोनवणेने १९ व ईव्हा भावसारने नाबाद १६ धावा केल्या. दहिसर स्पोर्ट्सच्या कर्णधार वेदिका जोशीने ३ तर धनश्री परब , प्राची पंडित व खुशी पटेल नी प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठी १७६ धावांचा पाठलाग करताना वैभवी बालसुब्रमणीयमच्या भेदक गोलंदाजी मुळे दहिसर स्पोर्ट्स क्लबला १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यात खुशी पटेलने २२, स्नेहल सिंगने २० तर साक्षी पेडणेकरने १५ व खुशबू पालने १४ धावा केल्या. एन डी सी ए गर्ल्सच्या वैभवी बालसुब्रमणीयमने ६ तर सिद्धी पिंगळेने २ व प्रचिती भवरने १ गडी बाद केला व संघाला ४३ धावांनी विजयी केले.