ब्रेकिंग

दिलखुलास’ कार्यक्रमात ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत* *‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ९ नोव्हेंबरला मुलाखतीचे प्रसारण*

*‘दिलखुलास’ कार्यक्रमात ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत*

*‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ९ नोव्हेंबरला मुलाखतीचे प्रसारण*

 

मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आनंदाचा शिधा’ तसेच विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम या विषयावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

 

राज्यात सणांचे दिवस सुरू आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासन स्तरावर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील रेशनकार्डधारक लाभार्थींना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम नेमका काय आहे, राज्यात याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, सणांच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, नागरिकांची कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी शासनस्तरावर कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येत आहे, गरजू लाभार्थ्यांसाठी विभागामार्फत कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत. याबाबतची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 7, बुधवार दि. 8, गुरुवार दि. 9 आणि शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

 

 

 

 

फेसबुक –

https://www.facebook.com/MahaDGIPR

 

यू ट्यूब –

https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे