विधान परिषद मतदार संघ;* *मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली पाहणी*
*विधान परिषद मतदार संघ;*
*मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली पाहणी*
*नाशिक, जनमत
जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे गोदाम सय्यद प्रिंप्री येथे उभारले आहे. याच गोदामात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची 2 फेब्रुवारी,2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी निवडणूक निरीक्षक निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण्.डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्वाती थविल, प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंप्री येथील नुतन गोदामात मतमोजणी होणार आहे. या गोदामात दोन मोठे हॉल, इव्हीएम स्ट्रॉंग रूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचाऱ्यांसाठी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्री. गमे यांनी मतमोजणी केंद्रावर सर्व साहित्य उत्तम दर्जाचे असावे. गुणतत्तापूर्ण कामे करण्यात यावीत. अधिकारी- कर्मचारी यांची भोजन, बैठक व्यवस्था उत्तम असावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.