ब्रह्माकुमारी पाठशाळे मध्ये हळदी कुंकु चे औचित्य साधून महिला आध्यात्मिक सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न
परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला
नाशिक- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने.. या प्रोजेक्ट अंतर्गत 7 फेब्रुवारी 2022 रोजी राणे नगर संचालिका ब्रम्हाकुमारी वीणा दीदी यांच्या अध्यक्षतेखाली कैलाश नगर, इंदिरा नगर ब्रह्माकुमारी पाठशाळे मध्ये हळदी कुंकु चे औचित्य साधून महिला आध्यात्मिक सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गायत्री फडे, सौन्दर्य तज्ञ रूपा बधी उपस्थित होते.
संदीप फौंडेशनच्या प्राध्यापिका डॉ. गायत्री फडे यांनी ब्रह्माकुमारी संस्थे सारख्या व्यासपीठ येणे आपले सौभाग्य आहे असे सांगून महिला सशक्तीकरण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या कि आजची महिला आर्थिक, बौद्धिक, सामाजिक, शारीरिक या चारही क्षेत्रात सशक्त झालेली आहे. महिलांनी याही पुढे जाऊन आपल्या सहकारी भगिनींना जागृत केले पाहिजे, यातून महिला जागृतीची एक नवी चळवळ निर्माण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
सौन्दर्य तज्ञ रूपा बधी यांनी बाह्य सौन्दर्य सोबतच आंतरिक सौन्दर्य खुलविण्यासाठी राजयोग मेडिटेशन इतका दूसरा पर्याय नाही असे मनोगत व्यक्त केले.
ब्रह्मा कुमारी वीणा दीदी यांनी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यामागील आध्यात्मिक रहस्य उलगडले. मस्तकी लावण्यात येणारा टीका म्हणजे आत्मिक स्मृतिचे प्रतीक होय. तसेच सुवर्ण युगाचे प्रतीक म्हणजे हळदी होय. कोणताही व्यक्ति आत्मिक स्मृति द्वारे सुवर्ण युगात जाऊ शकतो. आत्म व परमात्म परिचय प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने राजयोगा मेडिटेशनचा निशुल्क साप्ताहिक कोर्स करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून ब्रह्माकुमारी वीणा दिदिनी या प्रसंगी केले.
सूत्र संचालन बीके सुवर्णा श्रावगे यांनी केले. संस्थेचे साधक बीके अनीता, बीके भारती व बीके अरुणा यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव वर्षा निमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभक्ती गीत म्हणून सभेमध्ये नवचैतन्य फुलवले. कु.निधि च्या सुंदर नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकु सोबत वान म्हणून ईश्वरीय भेट वस्तु देण्यात आली. या प्रसंगी परिसरातील महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. अनेकांनी राजयोग कोर्स करण्याची इच्छा व्यक्त केल्या नंतर कैलाशनगर मनपा सभागृहात साप्ताहिक कोर्स चे आयोजन करण्यात आले असून अधिक माहिती साठी 83291 53882 या क्रमकावर संपर्क करण्याचे आवाहन ब्रम्हाकुमारी विना दीदी यांनी केले आहे.