ब्रेकिंग

मराठा लाईट इन्फट्री बटालियन कोल्हापूर येथे माजी सैनिकांसाठी पदभरती

वृत्त क्र. 387 दिनांक: 6 ऑक्टोबर, 2023

 

*मराठा लाईट इन्फट्री बटालियन कोल्हापूर येथे माजी सैनिकांसाठी पदभरती*

 

नाशिक जनमत वृत्तसेवा

माजी सैनिकांसाठी 109 Inf Bn (TA) Maratha LI कोल्हापूर यांच्यामार्फत 17 ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत 136 Inf Bn (TA) ECO, MAHAR युनिटसाठी सोल्जर जी. डी. व ट्रेडसमन पदांची भरती करण्यात येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

136 Inf Bn (TA) ECO, MAHAR मध्ये सहभागी होण्यासाठी 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता कोल्हापूर येथील 109 Inf Bn(TA) Maratha LI च्या युनिटमध्ये माजी सैनिकांनी उपस्थित रहावयाचे आहे. भरती प्रक्रिया सकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे दूरध्वनी क्रमांक 0253-2577255 वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे