गुरुद्वाराचे पवित्र व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्व परी प्रयत्न करू. पालकमंत्री दादाजी भुसे.
मालेगाव वृत्त क्र. 113 दिनांक : 8 नोव्हेंबर 2022
*गुरुद्वाराचे पावित्र्य व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू*
*: पालकमंत्री दादाजी भुसे*
*मालेगाव, दि. 8 नोव्हेंबर, २०२२ (उमाका वृत्तसेवा):*
नांदेड नंतर मनमाड येथील गुरुद्वारा हे शिख धर्मियांचे महाराष्ट्रातील पवित्र क्षेत्र असून या गुरुद्वाराचे पावित्र्य व नावलौकिक पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंती निमित्त शिख बांधवांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. मनमाड येथील गुरुद्वारात गुरुनानक यांच्या जयंती निमित्त दादाजी भुसे यांच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सुहास कांदे, अपर पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, पोलीस उपअधीक्षक समरकुमार साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, गुरु रणजितसिंह, गुरुजितसिंग कांत यांच्यासह शिख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना काळात या गुरुद्वारामध्ये असलेल्या अन्नछत्रच्या माध्यमातून गरजूंना व गोरगरीबांना अन्न मिळाले आहे. त्याबरोबरच येथे होणारे सामाजिक उपक्रम देखील निश्चितच कौतुकास्पद असून त्याची दाखल घेण्यात आली आहे.
या भागातील विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन श्री भुसे यांनी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गुरुद्वाराच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी पाठपुरावा केला असून त्यासाठी यापुढेही काम करण्यात येईल.
आमदार सुहास कांदे यांनी यावेळी शिख बांधवाना गुरुनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
0000000