नवनाथ हेंबाडे यांच्याकडून लोहशिंगवे येथील महाविद्यालयात हनुमान चालीसा विद्यार्थ्यांना वाटप.

नाशिक जनमत आज नवीन पिढी मोबाईल व दुसऱ्या देशातील गोष्टींचे अनुकरण करत आहे त्यामुळे तरुण पिढी परमात्मा व धार्मिक क्षेत्रापासून दूर जाऊ लागले सकाळ संध्याकाळ मोबाईल चा वापर वाढला यामुळे देवधर्म मानण्यास तरुण पिढी तील काही तरुण अध्यात्मिक ज्ञानापासून दूर जाऊ लागले दरम्यान यामुळे देखील सध्या
पाणी पाऊस कमी पडू लागला असल्याचे जुने नागरिक बोलत आहे दरम्यान पोळा सणाचे औचित्य साधून नांदगाव तालुक्यातील लोहशिग्वे येथील श्री नवनाथ रखमाजी हेंबाडे यांच्याकडून माध्यमिक विद्यामंदिर लोहशिंगवे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना * हनुमान चालीसा* पुस्तिका वितरण.. करण्यात आले.. आणि हनुमान चालीसा या दोनशे प्रति शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. अभ्यासाबरोबरच हनुमान चालीसाचे पठण विद्यार्थी करणार आहेत. दरम्यान या उपक्रमाचे शालेय शिक्षक विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कौतुक केले आहे पुढील काही दिवसांमध्ये नवनाथ हेंबाडे हे परिसरातील राजापूर व इत्यर गावातील विद्यार्थ्यांना हनुमान चालीसा पुस्तकाचे वितरण करणार आहेत