डाक विभागातील निवृत्तीवेतन धारकांनी 23 ऑगस्टपर्यंत करावेत अर्ज*
*निवृत्तीवेतन धारकांनी 23 ऑगस्टपर्यंत करावेत अर्ज*
*नाशिक, दिनांक 4 ऑगस्ट, 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक कार्यालयात 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पेन्शन व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील आपले अर्ज 23 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी कळविले आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टी.बी.ओ.पी/एम.ए.सि.पी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या तसेच डी पी सी च्या पुनारावालोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे 23 ऑगस्ट 2023 या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालत मध्ये आंतर्भाव केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना टपाल कार्यालयात उपलब्ध असून संबंधितांनी मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्ज प्रवर अधिक्षक डाक घर, नाशिक विभाग, जी. पी. ओ आवार, नाशिक -422001 या पत्त्यावर वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रवर अधिक्षक यांनी केले आहे.